Chief Minister Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde: कापूस, सोयाबीन आणि कांद्याने आम्हाला रडवलं; लोकसभेत मोठा फटका बसला: मुख्यमंत्री

Chief Minister Eknath Shinde: शेती, पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत का पराभव झाला याचं कारण सांगितलं.

Bharat Jadhav

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक भागात कांद्याने रडवले. ⁠तर, सोयाबीन आणि कापसाने आम्हाला त्रास दिला. त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय. ते केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत बोलत होते. शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी सह्याद्री बंगल्यावर बैठक होत आहे.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवांचं कारण सांगितलं. राज्यामध्ये सत्तेत असताना सुद्धा महायुतीला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळवता आले नाहीये. निवडणुकीत कोणत्या कारणांमुळे जागा कमी झाल्या याचं विचारमंथन महायुतीतील पक्ष करत आहेत. कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला याची माहिती मतदारसंघानिहाय घेतली जात आहे.

महायुतीला लोकसभेत संविधान बदलाच्या मुद्द्यासह कापूस, सोयाबीन आणि कांद्यांचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. आज सह्याद्री बंगल्यावर झालेल्या शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक झाली. त्यात खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी त्याची कबुली दिली. सोयाबीन आणि कापसा करता साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली पण आंचार संहितेत अडकली. दरम्यान ⁠सोयाबीन, कापूस आणि कांद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे काही ठोस निर्णय घेणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT