CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Chief Minister Eknath Shinde On Farmers: सरकारने शेतकऱ्यांना फसवलंय, हे विश्वासघातकी सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेता विजय वडेवट्टीवार यांनी केली होती. विरोधी पक्षनेत्याच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

'आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाही, आम्ही जे जे बोललं, ते ते केलं. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली. त्यावेळी माध्यमांशी बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांनी महायुती सरकारसह केंद्रातील मोदी सरकरावरही टीका केली.

हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. मोदी सरकारने उत्पादन शुल्काच्या दीडपट हमीभाव देणार असल्याचं सांगितलं. परंतु तसे झाले नाही. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी सरकारने केलं. सरकारला दीडपट हमीभाव देता येत नाहीये. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. हे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. बि- बियाणांचा काळाबाजार सुरू आहेत, अशी टीका विजय वडेवट्टीवार यांनी केली होती.

विरोधी पक्षनेत्याच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाहीत, आम्ही जे जे बोललं तेते केलं, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला. आम्ही जे बोललं आहे ते ते आम्ही दिलं आहे, विरोधकांनी तपासून पाहावं, उद्या जे काही अर्थसंकल्पात सगळ्यांच्या हिताच्यां गोष्टी निघतील, शेतकरी जनता , माता-भगिनींच्या हितांच्या गोष्टी अर्थसंकल्पात मांडल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हे सरकार काम करणारं सरकार असल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. खरिपाच्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांच्या निर्णय घेतलेत. आम्ही एनडीआरएफचे निकष आम्ही बदललेत. १५ हजार कोटी रुपयांची नुसती नुकसान भरपाई दिलीय. एक रुपयांत पीक विमा देणार आपलं पहिलं राज्य आहे. विरोधकांच्या उद्योग पळवण्याच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे सर्व समावेशक सरकार आहे. या महाराष्ट्रात १ लाख ३७ कोटींची गुंतवणूक झाली. त्यानंतर पाच लाख कोटी रुपयांची गुंतवूणक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT