Bhagat Singh Koshyari And eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही - एकनाथ शिंदे

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh koshyari) त्यांच्या भूमिकांमुळे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये शाब्दीक चकमकी झाल्या. परंतु, आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारनंतरही कोश्यारी यांनी मुंबईबाबत (Mumbai) वादग्रस्त विधान केलं आहे.'गुजराती लोक मुंबईतून गेले,तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. बाळासाहेबांचं योगदान आपल्या सर्वांना माहित आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही, मराठी माणसाच्या (Marathi People) मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली, असं शिंदे यांनी नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यपालांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मराठी माणसामुळंच मुंबईला वैभव मिळालं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी कुणालाही अवहेलना करता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली. मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच शिवसेना स्थापन झाली. राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. कुणाचाही अवमान होणार नाही, याची राज्यपालांनी काळजी घेतली पाहिजे.

आ्माध्यमांशी बोलताना शिंदे पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. नाशिक विभागाचा आढावा घेतला. रस्ते, वीज, आरोग्य, प्रकल्प, या सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य विक्षाग सक्षण करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. रस्त्यांचे प्रश्ने मार्गी लावणे, पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची समस्या उद्भवू नये याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.

कृषी विभाग सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. मालेगावमध्ये अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शिंदे-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. रखडलेलं प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पोलिसांच्या घरांसाठी अॅक्शन प्लॅन तयार आहे. मालेगाव जिल्हा निर्मिती संदर्भात लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. मालेगाव मध्ये नुकसानीचा आढावा घेतला. मालेगाव जिल्हा निर्मीती ही जुनी मागणी आहे, या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. पोलीस भरती लवकरच होईल, तशा प्रकारच्या सूचाना दिल्या आहेत, असंही शिंदे म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT