Sharad pawar Ans Eknath Shinde
Sharad pawar Ans Eknath ShindeSaam TV

पक्षातील एकनाथ शिंदेंपासून सावध राहावं लागणार; शरद पवारांच्या उपस्थितीत अनिल गोटेंचं वक्तव्य

मला गटबाजीची तिडीक, काम करणारे लोक कधीही मुंबईला तक्रार करायला येत नाहीत.
Published on

धुळे : सर्वच पक्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भविष्यात पक्षातील अशा शिंदेंपासून आपल्याला सावध राहावं लागणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज धुळ्यातील नूतन राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्या उपस्थित गोटे यांनी हे भाषण केलं. या भाषणात त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीच्या विषयावरून सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'पक्षाचे कार्यकर्ते कसे नसावेत, हे मी सांगतोय मला माफ करा. आपण पैसे दिले जनरेटर दुरुस्त करायला, तर जुन्या लोकांनी केलं नाही. आम्ही काम करायला गेलो तर कव्हर खालून जनरेटर गायब, असली लोकं आधी घालवली पाहिजेत. कार्यालय उभारण्यासाठी अधिकारी किंवा कुणाकडूनही एक पैसा घेतलेला नाही. काही लोकांनी तुम्हाला सांगितलं की केवळ रंगरंगोटी केली. काहींनी सांगितलं झेंडा खूप मोठा केला.

सर्वच पक्षात एकनाथ शिंदे, भविष्यात पक्षातील अशा एकनाथ शिंदेंपासून आपल्याला सावध राहावं लागेल. मला गटबाजीची तिडीक, काम करणारे लोक कधीही मुंबईला तक्रार करायला येत नाहीत. काम न करणारेच मुंबईत तक्रार करायला येतात. मी राष्ट्रवादीला जिल्ह्यातून ३ आमदार निवडून आणून देईल कार्यक्रमाचे बॅनर पाहून आज कळलं आपल्या पक्षात इतके कार्यकर्ते आहेत असा टोला देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com