eknath shinde with indorama company authorities  saam tv
महाराष्ट्र

राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार, 'या' शिष्टमंडळाने CM शिंदेची घेतली भेट

उद्योग वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं मोठं आश्वासन, म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : मागासलेल्या भागात रोजगार निर्मीती व्हावी यासाठी उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. इंडोरामा कंपनीच्या (indorama company) शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. इंडोरामा या कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष (employment) रोजगार निर्मीती होणार आहे.

इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर येथे वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रूपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. येत्या तीन ते चार वर्षात टप्प्या टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे या भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळात इंडोरामाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल लोहीया, मुख्य कार्यकारी अधीकारी सुधिंद्र राव यांचा समावेश होता. लोहीया यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पुष्पगुच्छ,शाल आणि स्मरणचिन्ह देऊन सन्मानित केले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

राज्यसभेवरून मविआत 'महासंग्राम', पवारांना राज्यसभा देण्यास कॉंग्रेसचा विरोध

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड

जो जीता वही 'सिकंदर' ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

दादांच्या घातपातावर सर्व पवारांचं एकमत, रोहित पवारांपाठोपाठ सुळेंनाही संशय

SCROLL FOR NEXT