Rahul Gandhi and Devendra Fadnavis at the center of fresh political controversy. Saam Tv
महाराष्ट्र

खासदार राहुल गांधींची काँग्रेसमधून हाकलपट्टी होणार? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Devendra Fadnavis Target Rahul Gandhi: भाजप विरुद्ध काँग्रेसमधील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • फडणवीसांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद

  • राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

  • भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष तीव्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहेत, त्यामुळे त्यांची पक्षातून हटवण्यात यावी अशी मागणी केली जातेय. राहुल गांधी केवळ आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या पक्षाचे नेतृत्व वाचवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमचे ध्येय संविधानाचे रक्षण करणे : राहुल गांधी

याआधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शीरसंधान केलं होतं. भारताचे संविधान मोडीत काढणे हा या संघटनांचा मुख्य उद्देश आहे. आज आपण ज्याला भारत म्हणतो ते संविधानाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही.

आज आरएसएस-भाजप विचारसरणीचे लोक संविधानच रद्द करू इच्छित आहेत, ते काहीही म्हणोत, त्यांचे खरे उद्दिष्ट संविधान नष्ट करणे हेच आहे, कारण भारतात सर्वांना समान वागणूक मिळावी असे त्यांना वाटत नाहीये. ते काहीही करोत, ते आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कदाचित नतमस्तकही होतील, पण त्यांचे ध्येय संविधान नष्ट करणे आहे.

आमचे ध्येय संविधानाचे रक्षण करणे आणि ते अधिक मजबूत करणे आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. संविधानाचा आत्मा आणि संरक्षणाचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, अशी आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही 'रन फॉर आंबेडकर, रन फॉर कॉन्स्टिट्यूशन'चे आयोजन केले आहे."

यानंतर फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी मंडी हाऊस येथून काँग्रेसच्या अनुसूचित जाती (एसटी) शाखेने आयोजित केलेल्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. "ही शर्यत बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या आदर्शांप्रती आणि भारताच्या संविधानाप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आज जेव्हा घटनात्मक मूल्यांवर हल्ला होतोय, तेव्हा बाबासाहेबांनी दाखवलेल्या त्याच निर्धाराने आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व प्रकारच्या अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढले पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय हिंद.",अशी फेसबूक पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधींच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून हटवण्याची मागणी जोर धरत आहे." आपल्या पक्षात सुरू असलेल्या संघर्षावरून लक्ष विचलित करण्यासाठी गांधींनी अशी विधाने केली आहेत, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT