काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राडा; महिला पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षामध्ये बाचाबाची

Congress Meeting Clash : जालन्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीमध्ये आज मोठा राडा झाला. महिला पदाधिकारी नंदा पवार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्यावतीने जिल्हा स्तरावर आणि लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली जात आहे. यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातोय. जालन्यातही आढावा बैठक घेण्यात आली मात्र काँग्रेस पक्षातील नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. महिला पदाधिकारी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांमध्ये वाद झाला. पक्षातून का हाकलपट्टी करण्यात आली याचा जाब महिला पदाधिकारी विचारत होती. त्यावेळी महिलेने अर्वाच्य भाषा वापरली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना महिला पदाधिकारीने शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी चक्क पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांना रोखलं. महिला पदाधिकारीचे नाव नंदा पवार असे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com