CM Devendra Fadnavis on Abu Azmi  Saam Tv News
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वारीसंदर्भात अबू आझमी बरळले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर; फालतू...

CM Devendra Fadnavis on Abu Azmi : 'अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. कारण त्यांना असं वाटतं की, वादग्रस्त विधानं केली की, प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Prashant Patil

नागपूर : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. पण मुसलमानांनी नमाज पठन केल्यानंतर तक्रारी दाखल केल्या जातात', असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे. त्यावर, 'अबू आझमींना वादग्रस्त विधानांचा शौक आहे. अशा विधानांमुळे प्रसिद्धी मिळते', अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. कारण त्यांना असं वाटतं की, वादग्रस्त विधानं केली की, प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळे मी अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अबू आझमी काय म्हणाले?

'मशिदीबाहेर नमाज पठण करु शकत नाही. आम्ही कुणाची तक्रार करत नाही आहोत. आम्ही आमच्या हिंदू बांधवाच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कधीही कुठल्या मुसलमानाने ही तक्रार केली नाही की, रस्त्यावर उत्सव का साजरी केला जातो? मी पुण्याहून येत होतो. तेव्हा मला लोकांनी सांगितलं की, पालखी जाणार आहे. त्यामुळे लवकर जा. नाहीतर रस्ता जाम होईल. रस्ता जाम होत आहे. पण आम्ही कधी विरोध केला नाही. आमच्या नमाज पठणाच्या वेळी जाणीवपूर्वक या देशात मुसलमानांसाठी जमीन कमी केली जात आहे', असं वादग्रस्त अबू आझमी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या हैदराबाद हाऊस मध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

SCROLL FOR NEXT