CM Devendra Fadnavis clarifies on Khau Galli row, says traders shut shops due to chaos, not to block food for protesters. saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: खाऊगल्ली का बंद होती? व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Clarifies on Closure of Shops : मराठा आंदोलनाच्या वेळी दुकाने बंद असल्यानं सरकार आरोप करण्यात आला होता. परंतु व्यापऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यामागे सरकारचा कोणताच हेतू नव्हता,असं फडणवीसांनी सांगितलंय.

Bharat Jadhav

  • आंदोलनादरम्यान खाऊगल्लीतील दुकाने बंद होती.

  • जरांगे यांनी दुकाने बंद करण्यावरून सरकारवर आरोप केला.

  • फडणवीसांनी व्यापाऱ्यांच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं.

मनोज जरांगे यांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवशी त्या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. खाण्यापिण्याची दुकाने बंद असल्यानं राज्यभरातून मराठा बांधवांना जेवण पुरवण्यात आलं. परंतु आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये, यासाठी दुकाने बंद करण्यात आली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता.

या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काही लोकांना त्या ठिकाणी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. आता दुकाने उघडी आहेत आणि राहतील असं असं मुख्यमंत्री म्हणाले.

धुडगूस घातल्याने दुकानं बंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काहीजणांनी धूडगुस घातला, त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली होती. त्यावरून आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात आला. कुणीही व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले नव्हते.

काही लोकांनी धुडगूस घातल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ते कोणाच्या सांगण्यामुळे बंद झाले नव्हते. दरम्यान आम्ही व्यापाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही त्या ठिकाणी पोलीस फोर्स ठेवतोय. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी ठेवली आणि आताही ती उघडी आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदान परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आंदोलकांना अन्न आणि पाण्याची उपलब्धता होत नसल्याची माहिती मिळताच राज्यभरातून मुंबईकडे मदतीचा ओघ सुरू झाला.

दरम्यान आंदोलकांची कोंडी करण्यासाठी अन्न-पाणी मिळू नयेत यासाठी सरकारने हा आदेश दिल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. त्यानंतर मनोज जरांगे यांनीदेखील त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत राडा! भाजप आमदाराला खेचून बाहेर काढलं, बेशुद्ध होऊन खाली पडले, ३ आमदार सस्पेंड

Maharashtra Live News Update : जीएसटीचा निर्णय धाडसी आणि ऐतिहासिक आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Stomach Gas Remedies: पोटातील गॅस कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Asthma: अस्थमाचे रुग्ण आहात? मग 'या' गोष्टी अजिबात करु नका

Mumbai Protest: मुंबईतील आंदोलनावर बंदी आणा; शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT