महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर (maharashtra-chhattisgarh border) नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत (chhattisgarh naxalites encounter) ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेली ही चकमक अखेर आज संपली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
नक्षलवाद्यांविरोधातील या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलिसांचाही सहभागी होता. छत्तीसगडमध्ये येत्या २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे. या ऑपरेशमध्ये ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील नारायणपूर-अबुझमाडच्या भागातील रेकावायाच्या जंगलात कालपासून सुरू असलेली चकमक आज संपली. या चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. चकमक संपल्यानंतर नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जवान परत आले. जवानांकडून घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त सुरक्षा दलामुळे हे यश मिळाले आहे. या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलिसही सहभागी झाले होते. हे संयुक्त ऑपरेशन होते.
डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या ८०० जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांना पळून जाण्यासाठी एकही मार्ग शिल्लक नव्हता. आयईडी पेरल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात लपून बसले होते आणि छुप्यापद्धतीने गोळीबार करत होते. पण त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश आले नाही. नक्षलवाद्यांची संख्या आणि कारवाया पाहून जवान सतर्क होते आणि अखेर त्यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नक्षलवादी मोहिमेअंतर्गत छत्तीसगड सरकार नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करत आहे.
दरम्यान, छत्तीसगड राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीमध्ये आतापर्यंत १०७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवायांमध्ये जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि दंतेवाडा, नाराणपूर आणि बस्तर जिल्ह्यांच्या विशेष टास्क फोर्सचा समावेश होता. यासोबतच संबंधित जिल्ह्यातील पोलिस देखील या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.