Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: अरबी समुद्रात लवकरच होणार महाराजांचे स्मारक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं विधान

अरबी समुद्रात लवकरच होणार महाराजांचे स्मारक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम करून शिवस्मारक पूर्ण करण्यात येईल, अशी बाजू सरकारतर्फे पटवून देण्यात येईल. स्व. विनायक मेटे यांचे शिवस्मारक उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बीड येथे आयोजित स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येथे आगमन झाल्यानंतर त्‍यांनी प्रथम स्व. विनायकराव मेटे यांच्या स्मृती स्थळास भेट दिली व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी स्व.विनायकराव मेटे यांनी केलेले प्रयत्न बहुमोल आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजातील गरीब व दुर्बल लोकांसाठी ते झटले. त्यांच्या प्रयत्नामुळे सारथी या शासकीय संस्थेच्या उभारणीत योगदान आहे. (Latest Marathi News)

फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू होते. या सारखी संस्थेच्या माध्यमातून 103 विद्यार्थी मोठे यश संपादन करत त्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. त्यांच्या कार्याला पूर्ण करताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देताना मेटेंचा थेट सहभाग होता. त्यांच्या विचारांच्या धर्तीवर काम करताना आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांना संरक्षण देत नियुक्त करण्याचा मोठा ताकदीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तेथे स्व. विनायक मेटे पुतळा उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच मुंबई जवळ अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण झाल्यानंतर सगळेजण नक्कीच यासाठी स्व. विनायक मेटे यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण काढतील व नाव घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT