Akola Bus Accident: अकोल्यात मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. अकोट ते पुणे जाणारी खाजगी लक्झरी बस शेगांव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक पलटल्याची माहिती समोर येत आहे. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये ३० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला- दर्यापूर-अकोट मार्गे येथून पुणे करता जाणारी लक्झरी बस देवरी शेगाव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक रात्री सुमारे सव्वा सातच्या सुमारास पलटी झाली. त्यामध्ये ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अकोट येथून नियमित श्री गणेश ट्रॅव्हल च्या मालकीची एमएच ३० एच १२०१ ही लक्झरी बस पुणे करिता धावते सायंकाळी ६.३० वाजता ही बस अकोट वरून पुण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, देवरी ते अडसूळ दरम्यान येणाऱ्या हनवाडी ते पिवंदळ फाट्यादरम्यान चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस बाजूच्या शेतात जावून पलटी झाली.
यामध्ये तब्बल ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील तीन जण गंभीर असल्याची माहिती आहे.या सर्व रुग्णांच्या मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ पुढे आले, आठ रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)
देवदर्शनावरून परतताना टँकर आणि जीपमध्ये भीषण अपघात
दरम्यान, आज सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये टँकर आणि जीपचा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ हा अपघात झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.