Shivjayanti 2023 Saamtv
महाराष्ट्र

Shivjayanti 2023: शिवनेरीवर महाआरतीचा विश्वविक्रम; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

शिवजयंतीनिमित्त विश्वविक्रमी ३० हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या महाआरतीने शिवनेरी गड उजळून निघाला...

Gangappa Pujari

Shivjayanti 2023: आज १९ फेब्रूवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. जगभरात शिवरायांची जयंती मोठ्या जल्लोशात पार पडत आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचा विश्वविक्रम झाला. (Shivneri)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) महाआरतीला राज्यातील सुमारे ३० हजार शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. महिला व बालविकास, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत महाआरती सोहळा पार पडला. याप्रसंगी हभप पंकज महाराज गावडे, आशा बुचके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.

शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम घडला आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमी विक्रमी संख्येत या महाआरती सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

या विक्रमाची नोंद घेण्यासाठी लिमका बुक ऑफ रेकॉर्डचे आधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाने पहिल्यांदाच या महाआरतीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शिवभक्तांनी विक्रमी संख्येत हजेरी लावून विश्वविक्रम नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक!'२१ वर्षांपर्यंत थांब' म्हणताच १९ वर्षीय प्रियकराने संपवलं आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

SCROLL FOR NEXT