Amit Shah: महाराष्ट्रातील सर्व 48 जागा मोदींच्या झोळीत टाका, अमित शाहांची महाराष्ट्राला साद

Amit Shah: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवला होता. तो पक्ष आता पुन्हा धनुष्यबणासह भाजपसोबत आला आहे, असे शाह म्हणाले.
Amit Shah
Amit Shahsaam tv
Published On

Amit Shah: केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी आयोजित सभेत बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद महाराष्ट्राला घातली आहे.

यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवला होता. तो पक्ष आता पुन्हा धनुष्यबणासह भाजपसोबत आला आहे.

Amit Shah
Uddhav Thackeray Speech: निवडणूक आयोगाच्या निकालाने 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांवर टीकास्त्र

या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. 2019 मध्ये आपण देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढलो होतो. मोठा फोटो मोदींचा होता, छोटा फोटो उद्धव ठाकरेंचा होता. अनेक वेळा म्हणालो होतो देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडणुका लढत आहोत. मी प्रत्येकवेळी म्हणालो, मोदी देखील सर्व सभेत म्हणाले. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि तोंडाला पाणी सुटलं. सर्व सिद्धांत सोडून शरद पवारांच्या शरणात गेले, अशी टिका अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केली.

शाह म्हणाले, पक्ष कुणाचा मोठा होता, कोण मुख्यमंत्री बनायला हवं होतं. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. सत्तेसाठी आम्ही सिद्धांत सोडले नाही. बाळासाहेबांचा पक्ष पवारांच्या चरणात बसला होता. आता वेळेने कुस बदलली आणि मूळ शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसोबत आली आहे.

Amit Shah
Sanjay Raut : 'शाखा ताब्यात घ्यायला त्यांचे बाप...', संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, आम्हाला सत्तेचा मोह नाही. आमच्या मनात महाराष्ट्राचे हित सर्वोपरी आहे. आज देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे काम भाजपच्या जास्त असलेल्या आमदारांनी केले आहे. आज त्यांना (उद्धव ठाकरेंना) धडा देखील शिकवण्याचे काम केले आहे.

शाह म्हणाले, महाराष्ट्रात बहुमत मिळावं अशी आमची अपेक्षा नाही. गेल्या निवडणुकीतही 48 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. परंतु यावर आम्ही संतुष्ट नाही. यावेळी बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवा आहे. सर्वच्या सर्व 48 जागा भाजपच्या झोळीत टाका, मोदींच्या झोळीत टाका. शिवसेना भाजप पक्ष पुन्हा एकदा हे सिद्ध करेल की कुटील बुद्धीने काही काळासाठी सत्ता मिळवता येऊ शकते, परंतु रणमैदानात येण्याची वेळ येते तेव्हा केवळ साहस, शौर्य आणि परिणामच कामी येतात. ते तुमच्याकडे नाही, भारतीय जनता पक्षाकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com