Chhatrapati Shahu Maharaj News  Saam Digital
महाराष्ट्र

Chhatrapati Shahu Maharaj News : संजय मंडलिकांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात राजकीय राडा; वाद चिघळण्याची शक्यता

Maharashtra Election 2024 News | Sanjay Mandlik On Shahu Maharaj: कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलं आहे.

Sandeep Gawade

Sanjay Mandlik Statement Chhatrapati Shahu Maharaj

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलंय. आताचे महाराज दत्तक आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. संजय मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोल्हापुरात राजकीय राडा सुरू झाला आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार, संजय राऊतांचे दाखले देत मंडलिकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून काँग्रेस नेते सतेज पाटलांनी प्रवीण दरेकरांना चांगलंच सुनावलंय. दुसरीकडे कोल्हापूरच्या नाहीतर मोदींच्या घराण्याचा मान राखयचा का असा सवाल राऊतांनी केलाय. तर शरद पवारांनी विरोधक अतिशय खालच्या पातळीवर गेल्याची टीका केलीय. कोल्हापूरच्या आखाड्यात यंदा हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी विचाराची लढाई पाहायला मिळणार आहे.

शाहू महाराज नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले हे खरं असलं तरीही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी जपलाय. शाहू महाराजांबद्दल जनमानसात आदराची आणि प्रेमाची भावना आहे. त्यामुळे संजय मंडलिकांची टीका त्यांच्या अंगलट येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT