Chhatrapati Sambhajinagar Vaijapur car accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News : इंजिन हवेत, चाक निखळले, भरधाव कार उलटली; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक भीषण अपघात झालाय. भरधाव कार उलटल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक भीषण अपघात झालाय. भरधाव कार उलटल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या नांदगाव शिवारात आज दुपारी भरधाव कार उलटली. या अपघातात दर्शन पांडुरंग जगताप आणि राहुल राजाराम या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही राहणार भग्गाव येथील रहिवाशी आहेत. अपघाताची घटना घडताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून त्या दोघांनाही मृत घोषित केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचं बोनेटमधील इंजिन आणि पुढचे दोन्ही चाक कारपासून वेगळे झाले. कारमधून इंजिन निघून ते पुढे काही अंतरावर जाऊन पढले. प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताची आपबीती सांगितली.

नांदेड-हिंगोली सीमेवर ट्रॅक्टरचा भीषण अपघात

दरम्यान, नांदेड-हिंगोली सीमेवर आज ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे दोन जिल्ह्येच नाही तर अवघा महाराष्ट्र हळहळला. महिला शेत मजुरांना नेताना चालकांचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळलं. या अपघातात एकाच गावातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव येथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या. सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या त्यावेळी अचानक अपघात झाला.

या अपघातात एकाच गावातील ७ महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील दोन सुना पार्वती आणि सरस्वती या दोन सुनांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीमध्ये शेतमजूर राहत होते. नेहमीप्रमाणे हे नागरिक शेतमजुरीचे काम करत असत आज सकाळी शेतातील कामानिमित्त ट्रॅक्टरमध्ये बसून हे मजूर जात होते. दरम्यान, गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये हे ट्रॅक्टर पडल्याने कामगार महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विहिरीतून एकूण ७ मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून तीन जणांना वाचवण्यात स्थानिक आणि प्रशासनाला यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT