क्रुरतेचा कळस! वराह व्यवसायात अडथळा, १५० मोकाट कुत्र्यांवर विषप्रयोग करुन संपवल्याचा दावा; अकोल्यात खळबळ

Akola Poisoned 150 Dogs to Death : अकोल्यातल्या गुडधी भागात काही माथेफिरुंनी क्रुरतेचा कळस गाठत मुक्या प्राण्यांना खाण्यातून विष दिल्याचा प्रकार समोर आला. २५ पेक्षा अधिक कुत्र्यांचा यादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Akola Poisoning of more than 150 dogs
Akola Poisoning of more than 150 dogsSaam Tv News
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : अकोल्यातल्या गुडधी भागात काही माथेफिरुंनी क्रुरतेचा कळस गाठत मुक्या प्राण्यांना खाण्यातून विष दिल्याचा प्रकार समोर आला. २५ पेक्षा अधिक कुत्र्यांचा यादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात बातमी 'साम'ने दाखवली होती. त्यानंतर अकोल्यातल्या आधार फॉर ॲनिमल संस्थेसह अकोला पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली, शवविच्छेदन प्रक्रियेसाठी हे सर्व मृत श्वान पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले. अन त्यांच्यावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली. तसेच सिव्हिल पोलीस ठाण्यात या प्रकरणात प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कुत्रे भुंकतात म्हणून हे भयंकर कृत्य केल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच विषबाधामूळ गंभीर स्थितीत असलेल्या सर्व मोकाट श्वानांना ॲनिमल केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

अकोल्यातल्या गुडधी भागात क्रुरतेचा कळस गाठनारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना काल रात्री समोर आली. मुक्या प्राण्यांना विषारी औषध देत जिवे ठार मारलं. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका व्यक्तीने क्रुरतेचा कळस गाठत थेट या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिल्याचं समजतं आहे. यात जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्याने विषबाधा झाली. अवघ्या काही तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलाय. तर काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहेत. या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांत काल रात्री तक्रार दाखल झाली होती. अगदी रस्त्याने जाताना मोकाट कुत्रे आपल्याकडे पाहून भुंकतात, त्यातूनचं असं भयंकर कृत्य केल्याचा आरोप, भाजपचे पदाधिकारी संदीप गावंडे यांनी केला होता. मात्र या घटनेनं परिसरातून मुक्या श्वानांबाबत हळहळ व्यक्त होत आहे. तर मारेकर्‍यांबद्दल रोष व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांनी संशयित व्यक्तीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले अजून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते? हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Akola Poisoning of more than 150 dogs
Pune News : वहिनी रक्तस्त्राव आणि वेदनेनं विव्हळत होती, मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा; नणंदेनं सांगितला थरारक घटनाक्रम

१५० पेक्षा अधिक कुत्र्यांचा विषारी अन्न खाल्ल्याने मृत्यू?

मागील काही दिवसात अकोला शहरात जवळपास १५०० पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा आधार फॉर ॲनिमल संस्थेचे संस्थापक काजल राऊत यांनी केलाय. यासंदर्भात अकोला शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल आहेत. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. तसेच तपास अधिकारी ऐनवेळी फितूर होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वराह (डुक्कर) व्यावसायिकांनी हे संपूर्ण कृत्य केल्याचं राऊत यांनी म्हटलं. कारण, त्यांच्या व्यवसायाच्या आड हे मोकाट कुत्रे येतात, आणि त्यांच्या अंगावर भुंकू लागतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठा अडथळा ठरतो. याच कारणातून वराह व्यवसायिकांनी अन्नातून विष देत निष्पाप मुख्य प्राण्यांचा बळी घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

Akola Poisoning of more than 150 dogs
Vijay Wadettiwar: सरकारवर विरोधकांचा सर्वात मोठा आरोप; मंत्रालयात व्यापारी, बिल्डरांच्या चकरा, भ्रष्टाचार वाढलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com