
संजय सुर्यवंशी, साम टीव्ही
नांदेड : नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या भीषण अपघात ७ जणांचा करुण अंत झाला. हिंगोली-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, ७ जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण गावासह अख्खा महाराष्ट्र देखील सुन्न झाला आहे.
हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील या शेतकरी महिला मजूर आहेत. ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. दोन महिलांसह एका पुरुषाला सकाळी बाहेर काढण्यात आलं.दुर्दैवाने या घटनेत ७ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. विहिरीत पाणी जास्त असल्याने बचावकार्यात सकाळ पासून मोठा अडथळा निर्माण झाला होता. तब्बल ६ तास बचावकार्य पूर्ण करत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले. आता बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिला या एकाच गावातील असल्याची माहित समोर आली आहे.
मृत महिलांची नावं
ताराबाई सटवाजी जाधव (वय ३५)
धुरपता सटवाजी जाधव (वय १८)
सिमरण संतोष कांबळे (वय १८)
सरस्वती लखण भुरड (२५)
चऊत्राबाई माधव पारधे (वय ४५)
सपना/मिना राजु राऊत (२५)
ज्योती इरबाजी सरोदे (३०)
बाहेर काढलेल्या मजुरांची नावं
पार्वतीबाई रामा भुरड (वय ३५)
पुरभाबाई संतोष कांबळे (वय ४०)
सटवाजी जाधव (वय ५५)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.