Chhatrapati Sambhajinagar Tragedy Saam
महाराष्ट्र

नवरात्रौत्सवात दुर्दैवी घटना, दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Tragedy: लासुर स्टेशन येथे दांडिया खेळताना महिलेला हृदयविकाराचा झटका. जागीच मृत्यू. डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Bhagyashree Kamble

  • दांडिया खेळताना खाली कोसळल्या.

  • महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.

  • गावात हळहळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दांडिया खेळत असताना एका महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. दांडिया खेळत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्या दांडिया खेळत असताना खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

नंदिनी अंबादास पवार (वय वर्षे ३५) असे मृत महिलेचं नाव आहे. नंदिनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन परिसरातील रहिवासी होती. लासूर स्टेशन येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाला काल शुक्रवारी गालबोट लागलं.

दांडिया खेळत असताना एका महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी नंदिनी अंबादास पवार नवरात्री उत्सवात दांडिया खेळत होत्या. त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. उपस्थित भावीकांनी त्यांना त्वरित खाजगी दवाखान्यात दाखल केलं.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी या आरापूर येथील धनंजय ऑटो कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. त्यांना दोन मुले असून, आज शनिवारी शवविच्छेदन अहवालानंतर पाडळसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Alert : ; पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

Pune Garba: भाजप खासदारानं गरबा बंद पाडला; ऐन कार्यक्रमावेळी खासदाराची धाड

ना ओळख, ना पाळख! आईच्या डोळ्यासमोरच 5 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या; माथेफिरूच्या कृत्याने सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी वाढ....भंडारा - ब्रह्मपुरी, भंडारा - कारधा हे दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद....

Amrut Bharat Express : दसऱ्यापूर्वीच भारतीय रेल्वेचं मोठं गिफ्ट! महाराष्ट्रातून धावली नवी अमृत भारत ट्रेन, कुठे-कुठे थांबणार?

SCROLL FOR NEXT