ना ओळख, ना पाळख! आईच्या डोळ्यासमोरच 5 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या; माथेफिरूच्या कृत्याने सगळेच हादरले

Mental Illness And Violent Crimes In India: मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील एका गावात एका ५ वर्षांच्या निरागस मुलाची आईच्या समोरच हत्या करण्यात आली.
Horrifying scene from Dhar where a mentally disturbed man murdered a 5-year-old child in front of the mother.
Horrifying scene from Dhar where a mentally disturbed man murdered a 5-year-old child in front of the mother.Saam Tv
Published On

मध्यप्रदेश येथील धार जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षीय निरागस मुलाची त्याच्या आई समोरच हत्या केली. ज्या नराधामाने ही हत्या केली. तो मागच्या अनेक दिवसांपासून घरातून गायब होता. कोणतेही कारण नसताना आणि कुठलेही पूर्ववैमनस्य नसताना त्याने ही हत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहे.

https://www.aajtak.in/short-videos/video/dhar-murder-case-police-investigation-lcl-vtp-2343154-2025-09-27

मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एका 24 वर्षाच्या माथेफिरूने धारधार शस्त्राने एका लहान मुलाची त्याच्या आई समोरच हत्या केली. सांगितले जात आहे की, ज्यावेळी ही लहान लेकरू घराच्या अंगणात खेळत होता. आणि त्याचवेळी हा नराधम तेथे आला आणि समोर बसलेल्या त्याच्या आई समोरच त्या बाळाचे शिर धडा वेगळे केले. काही क्षणातच ती आई हतबल झाली. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या माथेफिरूला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीरीत्या जखमी झाला आहे.

Horrifying scene from Dhar where a mentally disturbed man murdered a 5-year-old child in front of the mother.
Shocking : मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून संतापली, लोखंडी चमच्याने चिमुकल्याला दिले चटके; आईला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि लोकांकडून आरोपी महेश याला सोडवून त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी एक विचित्र वर्तन करणारा महेश कुक्षी जवळील आली या गावातील एका घरात गेला आणि तिथे बसला.

बसल्यानंतर त्याने घरात खेळत असलेल्या ५ वर्षांच्या एका मुलाला घरातील धारदार हत्याराने वार करून ठार केले. ५ वर्षीय मुलाची हत्या झाल्याने परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी या विचित्र वर्तन करणाऱ्या महेश याला पकडून बांधले आणि त्याला बेदम चोपला.

Horrifying scene from Dhar where a mentally disturbed man murdered a 5-year-old child in front of the mother.
Crime : भिंतीवर डोकं आपटून २ वर्षांच्या मुलाला संपवलं, नंतर नराधम बापानं स्वत:वर चालवली कुऱ्हाड

एसपी मयंक अवस्थी यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की एका ५ वर्षीय मुलाची धारदार हत्याराने हत्या झाली आहे. घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. हत्येची घटना जोबट येथील भागदी गावातील महेश या व्यक्तीने केली होती. महेश तीन दिवसांपासून आपल्या गावाबाहेर होता. त्याच्या नातेवाईक देखील त्याला शोधत होते.

Horrifying scene from Dhar where a mentally disturbed man murdered a 5-year-old child in front of the mother.
पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

घटनेनंतर महेशच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले आणि त्यांच्याकडून चौकशी केली. चौकशीत समजले की, काही दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तो तीन दिवसांपासून घराबाहेर होता. हि हत्या त्याने कुठलेही कारण नसताना केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com