fish died due to polluted water Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात हजारो माशांचा दूषित पाण्यामुळे तडफडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात हजारो माशांचा दूषित पाण्यामुळे तडफडून मृत्यू

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन स्थळ असलेल्या पाणचक्कीतील हजारो माशांचा दूषित पाण्यामुळे तडफडून मृत्यू झाला. दूषित पाणी आणि वाढती उष्णता यामुळे पानचक्कीतील हजारो मासे मृत पावले असून मृत मासांच्या दुर्गंधीने पर्यटक त्रस्त झाले आहेत.

शेवटी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हौतातील पाणी उपसल्यानंतर मृत मासे बाहेर काढण्यात आले. वक्फ बोर्ड प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षीच पानचक्कीच्या हौदातील मासे मृत पावतात. मात्र याबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नागसेनवनाजवळ ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या पानचक्कीत शहरापासून सात किलोमीटर दूर असलेल्या डोंगररांगातून नहरीद्वारे पाणी आणले असून या पाण्यावर स्वयंचलीत अशी पिठाची गिरणी बसविण्यात आली आहे. नहर-ए-अंबरी आणि पानचक्कीसारखे अदभूत तंत्रज्ञान पाहण्यासाठी दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक येतात.  (Latest Marathi News)

पानचक्कीच्या हौदात दरवर्षी मासे सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात नहरचे पाणी आटले. त्यामुळे हौदातील पाणी दूषित झाले होते. परंतु हे पाणी बदलण्यात आले नसल्याने दुषीत होऊन दुर्गंधी सुटू लागली. या दूषित पाण्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे हौतातील मासे मृत पडू लागले. त्यामुळे सोमवारी जाळे टाकून काही मासे बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. (SAMBHAJINAGAR)

परंतु मंगळवारी बहुतांश मासे मृत पावले. त्यामुळे पानचक्की परिसरात चांगलीच दुर्गंधी पसरली. याचा त्रास पर्यटक आणि पानचक्की भागात वक्फच्या कामासाठी येणाऱ्या आणि नमाजसाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे. उशिरा जाग आलेल्या वक्फ प्रशासनाने मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हौदातील पाणी उपसून काढले. त्यानंतर मृत पावलेले सर्व मासे पोत्यात भरून फेकले. (Viral Video News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT