Fraud Baba Arrested for Barbaric Acts Saam Tv News
महाराष्ट्र

Shocking: लघवी पाजली, नाकाला बूट लावत मानेवर पाय; गैरफायदा घेत भोंदूबाबाचे अमानुष कृत्य, VIDEO व्हायरल

Fraud Baba Arrested for Barbaric Acts: वैजापूरमधील शिऊर येथे एका भोंदू बाबाने अघोरी उपचाराच्या नावाखाली गावकऱ्यांवर अमानुष कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

अंधश्रद्धेच्या नावाखाली अमानुष कृत्य करणाऱ्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आला आहे. अघोरी कृत्य करत आरोपी लोकांना लघवी पाजायचा, तसेच नाकाला बूट लावत मानेवर पाय ठेवायचा. हा सर्व संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घडली असून, भोंदू बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

संजय रंगनाथ पगार असे आरोपीचे नाव आहे. बिरोबा मंदिर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अघोरी प्रकार करत असल्याची माहिती मिळाली होती. ज्यांना मूल होत नव्हतं, लग्न जमत नव्हतं, कामं बिघडत होती किंवा जे भूतबाधेने त्रस्त आहेत, अशा लोकांना तो टार्गेट करत होता. भोंदू बाबा लोकांच्या समस्यांचा फायदा घेत आपल्या जाळ्यात ओढायचा.

या उपचारादरम्यान आरोपी लघुशंका पाजणे, छातीवर उभं राहणे, पोटावर काठी ठेवणे असे अमानुष प्रकार करत होता आणि पीडित हे निमूटपणे सहन करत होते. १७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शिऊर येथील मंदिर परिसरात हा प्रकार पुन्हा घडला. संजय पगारने एका व्यक्तीला भंडारा टाकून मंत्रजप केला, ढोलकी वाजवत 'अलख निरंजन' ओरडत त्या व्यक्तीला उभं करून त्याच्या नाकाला बूट लावल्याचेही समोर आले. एका व्हिडिओत त्याने त्या व्यक्तीच्या मानेवर पाय ठेवले आणि पोटावर काठी ठेवत धमकी दिली की, 'सोड त्याला, नाहीतर धोपटी घालीन.'

हा संपूर्ण प्रकार व्हिडिओद्वारे उघड झाल्यानंतर किशोर शांताराम आघाडे (वय ४०, पोलीस हेडकॉन्स्टेबल, वैजापूर) यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. यावरून वैजापूर पोलिसांनी आरोपी संजय पगार याच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

मोठी बातमी! शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिली माहिती

गोळ्या घातल्या तरी माघारी हटणार नाही, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Nashik Tourism : त्र्यंबकेश्वरजवळ वसलंय निसर्गरम्य ठिकाण, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी सकाळी करा हे 4 उपाय; सूर्यदेव करतील पितृदोष दूर

SCROLL FOR NEXT