Crime: अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासोबत फोटो व्हायरल, राजकारणात नवा वाद उफाळला

Gurjeet Malhi's CSAM Arrest: अमेरिकेत बाल अश्लीलतेप्रकरणी गुरजीत मल्ही अटकेत. भगवंत मान आणि 'आप' नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; भाजप, काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया.
Gurjeet Malhi's CSAM Arrest
Gurjeet Malhi's CSAM ArrestSaam TV News
Published On

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे (CSAM) म्हणजेच चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात एनआरआय गुरजीत सिंह मल्ही यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण गुरजीत मल्ही यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बीजेपी चंदीगडने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून या प्रकरणावर तीव्र हल्ला चढवला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'जेव्हा गुरजीत मल्हीला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केली जाईल, तेव्हा या संदर्भात भगवंत मान आणि आप नेत्यांना उत्तर द्यावे लागेल', असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Gurjeet Malhi's CSAM Arrest
Baramati: कामाचा ताण असह्य; मॅनेजरची बँकेतच आत्महत्या, चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

भाजपने त्यांच्या पोस्टमध्ये गुरजीत मल्ही यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कुटुंबासह, विधानसभा अध्यक्ष कुलतार संधवां, अर्थमंत्री हरपाल चीमा आणि मंत्री लालचंद कटारूचक यांसारखे बडे नेते दिसत आहेत.

या प्रकरणात काँग्रेस नेते सुखपाल सिंह खैरा यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'भगवंत मान यांनी स्पष्ट सांगावं की त्यांच्या कुटुंबाचा आणि गुरजीत मल्हीसारख्या गुन्हेगाराचा काय संबंध आहे?" .

Gurjeet Malhi's CSAM Arrest
Politics: आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणारा मकोका आरोपी? पडळकरांचा खास माणूस कोण?

यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटच्या सिएटल युनिटने ११ जुलै रोजी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून गुरजीत सिंह मल्ही यांच्या अटकेची माहिती आणि फोटो शेअर केले. निवेदनानुसार, ४२ वर्षीय गुरजीत सिंह मल्ही यांना वॉशिंग्टनमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर चाईल्ड पोर्नोग्राफीचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com