Soygaon taluka Two brothers drown Saam Tv News
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : बैल धुण्यासाठी पाण्यात उतरले, २ दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू; १७ वर्षीय पोरीनं एकाला वाचवलं

Chhatrapati Sambhajinagar 2 Brothers Drowned to Death : बैल धुण्यासाठी ते पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. अखिल शकील पठाण आणि अहियान पठाण असं मृत पावलेल्या दोन्ही १८ वर्षीय तरुणांचं नाव आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात दोन सख्ख्या चुलत भावांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एकाला वाचविण्यात यश आलं आहे. नांदगावमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. बैल धुण्यासाठी ते पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. अखिल शकील पठाण आणि अहियान पठाण असं मृत पावलेल्या दोन्ही १८ वर्षीय तरुणांचं नाव आहे. तर एका १७ वर्षीय मुलीने त्यांच्यापैकी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण नांदगाव गावात शोकाकुल वातावरण आहे.

बुलढाण्यात शेतकऱ्याचा करुण अंत

बुलढाण्यात देखील काहीसा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात काम करायला गेलेल्या शेतकऱ्याला शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खामगाव तालुक्यातील उमरा अटाळी या गावातील शेतकरी मोरेश्वर दिलीप गुरव हे शेतामध्ये लावण्यात आलेल्या ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पिकाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विजेच्या प्रवाहाच्या तारांना हात लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. घरचा कर्ता माणूस गेल्याने अख्ख्या कुटुंबाने टाहो फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT