Sillod taluka the groom and bride carried on their shoulders Saam TV News
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : एका लग्नाच्या फजितीची गोष्ट, पावसाने दैना केली, नवरदेव नवरीला वऱ्हाडींनी खांद्यावर उचलून नेलं

Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथे एका विवाह समारंभात ऐन वेळी सुरू झालेल्या पावसामुळे लग्नातील वधू-वरासह वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ झाली.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे नव वधू-वराची चांगलीच धावपळ झाली. लग्न लागल्यानंतर पाऊस आला आणि त्यानंतर नवरा नवरीला तिथून खांद्यावर घेऊन जावं लागलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. या दरम्यान सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथे एका विवाह समारंभात ऐन वेळी सुरू झालेल्या पावसामुळे लग्नातील वधू-वरासह वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ झाली. शेतात लग्न असल्याने पावसामुळे त्याठिकाणी सर्व चिखल झाला आणि त्यातून वधू-वरांना वराडी मंडळींनी चक्क उचलून नेत शेतातून नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत, कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra weather alert) ६ आणि ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील ४८ तास राज्यात सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा (unseasonal rain Maharashtra) इशारा दिलाय. देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंत उद्यापासून पाऊस कोसळणार आहे.

त्याचदरम्यान, नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरु झालाय. या वादळी वाऱ्याने पत्रा जोरात हवेत उडाला. हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यात जाऊन घुसला असता. मात्र, तो वेळीच खाली वाकल्याने तरुण थोडक्यात बचावला. तर जिल्हा आणि सत्र न्यायालयावरील पत्रे देखील वादळी वाऱ्याने उडाले आहेत. सिडको परिसरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर, पुण्यासह राज्यातील (IMD rain forecast) अनेक शहरासाठी पुढील ४८ तासांत यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत Mumbai rain update मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (thunderstorm warning, hailstorm forecast) वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT