Chhatrapati Sambhajinagar Saam TV Marathi News
महाराष्ट्र

BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना युती तुटली आहे. तिकीट वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांचा संताप, एबी फॉर्मसाठी मोठी धावपळ पाहायला मिळतेय.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar BJP Shiv Sena alliance break news : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीला तडा गेला. भाजपकडून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली होती. पण भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले, मात्र पक्षाकडून एबी फॉर्म मिळालाच नाही. त्यामुळे अतुल सावे यांच्या कार्यलयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नाराज कार्यकर्ते, नेत्यांनी सावेंच्या ऑफिसमध्ये गर्दी करत आपली नाराजी, संताप व्यक्त केला. या नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली होती.

तिकिट वाटपावरून संभाजीनगरमध्ये भाजपध्ये जोरदार राडा झाला. इच्छुकांकडून आपली नाराजी बोलून दाखवण्यात आली. एका महिलेला तर अश्रू अनावर आले होते. तिकिट मिळाले नाही म्हणून एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांमुळे ही दुर्घटना टळली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. आम्ही एकनिष्ठ राहिलो ही आमची चूक झाली का? असा सवाल पक्ष नेतृत्वाला विचारण्यात येत आहे.

संभाजीनगरमध्ये युतीला तडा

मंत्री संजय शिरसाठ यांनी भाजपसोबतची युती तुटल्याची अधिकृत घोषणा आज केली आहे. संभाजीनगरमधील या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली आहे. पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात उमेदवारी अर्जांचे वितरण सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने कार्यालयात नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांना रडू कोसळलं

अकोल्यात तिकीट न मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या निवडणूक प्रभारीच्या निवासस्थानावर मोठा गोंधळ घातलाय.. भाजपच्या महिला पदाधिकारी शंकूतला जाधव हे अकोटफैल भागातून निवडणूक एससी प्रवर्गातून लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, हा वार्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याने जाधव प्रचंड नाराज झाले. शकुंतला जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी जात तिकीट न मिळाल्याचा जाब विचारला. त्यानंतर भाजपच्या निष्ठावंतांना डावलल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या दरम्यान जाधव यांचे अश्रू अनावर झाले होते. गोंधळ सुरू असतानाच जाधव यांची अचानक तब्येत बिघडली, आणि त्या अस्वस्थ खाली जमिनीवर कोसळल्यात. मात्र राष्ट्रवादीच्या वाट्यावर जागा गेल्यामुळे जाधव आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. मात्र या गोंधळानंतर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

नाशिकमध्ये AB फॉर्मची पळवापळवी -

नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे. एबी फॉर्मवरून जोरदार राडा झाला आहे. AB फॉर्मची पळवापळवी झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत फॉर्म घेऊन महामार्गावर पोहचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : एका महिन्यात किती वेळा फेशियल आणि क्लिनअप केले पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

Navi Mumbai: ऐन निवडणुकीत आमदार मंदा म्हात्रे आणि नाईकांमधील वाद पुन्हा उफाळला, नवी मुंबईचं राजकारण तापलं

झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

Silk Saree Designs: सिल्क साडीवर मॅचिंग नाही, हे 6 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिसतील परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

SCROLL FOR NEXT