Maratha Andolan  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation News : पोलिसांच्या नोटीसा, तरीही मराठा बांधव ठाम; मनोज जरांगेंसोबत ५०० ते ७०० ट्रॅक्टर मुंबईत नेणारच

डॉ. माधव सावरगावे

Maratha Andolan News :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होतील असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर मधून या दिंडीत ५०० ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या नोटीसांची पर्वा न करत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे २० जानेवारी रोजी पायी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. वाटेत त्यांच्यासोबत मराठा बांधव जोडले जाणार आहेत. छत्रपती संभाजानगर येथूनही मराठा बांधव पोलिसांनी दिलेल्या नोटिसा धुडकावून ५०० ट्रॅक्टरसह घेऊन या दिंडीत सहभागी होणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयक ५०० ट्रॅक्टर मुंबईला घेऊन जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यासाठी सध्या गावागावांत बैठका सुरू आहेत. मुंबईमध्ये ट्रॅक्टर नेऊ नये याबाबत ट्रॅक्टर मालकांना ठिकठिकाणी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

मात्र, यानंतरही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि समाजातील ट्रॅक्टर मालकांनी नोटिसा धुडकावून मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीत ट्रॅक्टर नेण्याचे नियोजन सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून ५०० ते ७०० ट्रॅक्टरचे नियोजन सुरू आहे, असं मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT