Chhatrapati Sambhajianagr News saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात रात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या जाळल्या; गोळीबारात एक जखमी

Fight Between 2 Groups In Sambhajinagar: यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात 2 पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच ते सहा जण जखमी झाले.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोन गटात तुफान राडा झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारी करत असलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला आणि काही क्षणातच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही गटाला आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार देखील करावा लागला.

यावेळी अनियंत्रित झालेल्या जमावाने पोलिसांच्या ताभ्यावरही हल्ला केला. जमावाकडून पोलिसांवर दडकफेक करण्यात आली. तसेच जमावाने पोलिसांची काही वाहने देखील जाळल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात 2 पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरू होता. मात्र आता पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. मध्यरात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच त्यांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. या वादात सुरुवातीला शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. यानंतर दोन्ही गटातील लोकांनी आपापल्या साथीदारांना बोलवले आणि हा वाद वाढतच गेला. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला.

परंतु वाद अधिकच चिघळला होता. यावेळी जमावाने पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केली. तसे पोलिसांच्या काही गाड्या देखील जामावाकडून जाळण्यात आल्या. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु तरीही जमावावर नियंत्रण मिळाले नाही त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून आता शहरात ताणवपूर्ण शांतता आहे.

रात्री घडलेल्या या राड्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच पोलिसांनी देखील या भागात बंदोबस्त वाढवला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT