Unauthorized Hoardings In Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग! २१ वर्षानंतर शहरातील होर्डिंगसह इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Chhatrapati Sambhajinagar News: मुंबई, पुणेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग्ससह अनधिकृत इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १६ मे २०२४

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर १७ निष्पाप लोकांचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होत आहे. मुंबई, पुणेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग्ससह अनधिकृत इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील सर्वच होर्डिंग्स आणि ज्या इमारतीवर होर्डिंग लावले आहेत त्या इमारतीसह त्यावरील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा असे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरात 420 होर्डिंग हे रामभरोसे असून महापालिका प्रशासनाने गेल्या 21 वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याची बाब आता समोर आली आहे.

त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने होर्डिंगच्या एजन्सी धारकांना 8 दिवसात अहवाल सादर करा अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जा, अशी सक्त ताकीद दिली आहे. शहरातील सेवन हिल, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप आणि सिडको परिसरात हे 410 अधीकृत होर्डिंग लागलेले आहे. आणि यामधले 90 टक्के होर्डिंग धोकादायक असून त्यांची मुदत 31 मार्च पर्यंतच होती.

मात्र मनपाने नोटीस बजावूनही संबंधित एजन्सीने स्ट्रक्चरल ऑडिट ला ठेंगा दाखवलाय. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये शहरात वादळी वाऱ्यासह अधून मधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने एखादी अप्रिय घटना होण्याचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळेच पालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्यासंदर्भात पाऊले उचचली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT