Maharashtra Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: वर्गातील भिंतींना तडे, पत्र्यांना छिद्र, बोरगावमधील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था; विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेतायेत शिक्षण

Maharashtra Latest News: खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तडे गेले आहेत तर तर काही खोल्यांची पावसाळ्यात गळती होत असून हे छत केव्हा कोसळेल हे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Gangappa Pujari

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर| ता: २ जुलै २०२४

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असणाऱ्या गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेची प्रचंड दुरावस्था झाली असून 596 विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून इंग्रजी तर 2 वर्षापासून गणित विषयासाठी शिक्षकच नसल्याने पालक अन् विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तडे गेले आहेत तर तर काही खोल्यांची पावसाळ्यात गळती होत असून हे छत केव्हा कोसळेल हे मात्र सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शाळेत जवळपास 596 विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे घेत असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या धोकादायक इमारतीकडे बघून पालक आणि विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत.

इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंत असणाऱ्या या शाळेत गल्लेबोरगाव सह आसपासच्या 8 ते 10 गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या शाळेतील खोल्यांना तडे गेलेत तर काही खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले असून झालेल्या या दयनीय अवस्थेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आता पालक वर्गही चिंतेत सापडला आहे.

दरम्यान या शाळेची झालेली दुरावस्था प्रशासनाने दूर करावी अन्यथा छत कोसळून जीवित हानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यास ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन याची गांभीर्याने दखल घेता की नाही हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT