Ghrushneshwar mandir saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराचा सोन्याचा प्राचीन कळस वाकला, कोसळण्याची शक्यता

Shri Grishneshwar Temple's Gold Finial in Critical Condition,देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या सोन्याचा कळस वाकला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा सोन्याचा प्राचीन कळस वाकलेला असून गेल्या कित्येक महिन्यांपासून तो तारेच्या साहाय्याने उभा ठेवण्यात आला आहे. मात्र हा कळस कधीही कोसळू शकतो अशी भीती भाविकांमध्ये आहे. तसेच मंदिर परिसरातील पुरातन संरक्षण भिंतही ढासळू लागली असून मंदिराच्या डागडुजीच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे.मालोजीराजे भोसले व अहिल्यादेवी होळकर यांनी लाल दगडात बांधलेले हे शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग असून येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा गाभारा आणि नंदी मंडप पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी विश्वस्त कार्यकारिणीकडे आहे.

गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाकलेल्या स्थितीत असलेल्या सोन्याच्या कळसाची दुरुस्ती करण्याची मागणी विश्वस्त कार्यकारिणीने पुरातत्व विभागाकडे अनेक वेळा केली मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच मंदिराच्या पुरातन भिंतीही ढासळू लागल्या असून त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाची की विश्वस्त कार्यकारिणीची यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाकलेल्या स्थितीत असलेल्या या सोन्याच्या कळसाची दुरुस्ती करण्याची मागणी विश्वस्त कार्यकारिणीने पुरातत्व विभागाकडे अनेक वेळा केली मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच मंदिराच्या पुरातन भिंतीही ढासळू लागल्या असून त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाची की विश्वस्त कार्यकारिणीची यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दानपेट्यांमधून लाखोंचा निधी तरीही मंदिर दुरुस्तीबाबत दुर्लक्ष?

मंदिर परिसरात सहा ते सात दानपेट्या ठेवण्यात आल्या असून दर आठवड्याला या पेट्या उघडल्या जातात.या पेट्यांमधून दर आठवड्याला अंदाजे १० ते १५ लाख रुपयांची देणगी संस्थेला मिळते.मात्र ही रक्कम मंदिराच्या डागडुजीसाठी खर्च होत नाही असा आरोप भाविकांकडून केला जात आहे.

भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट अभिषेकासाठी अधिक शुल्क?

परराज्यातून येणाऱ्या भाविकांना कोणतीही माहिती मिळावी यासाठी मंदिर परिसरात आवश्यक फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे अभिषेकासाठी भाविकांकडून जास्तीची रक्कम घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

Jio Recharge: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

SCROLL FOR NEXT