Nylone Manja Saam tv
महाराष्ट्र

Nylon Manja: नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! गुन्हा दाखल करत होणार कारवाई, पोलिसांचा इशारा

Legal consequences of using nylon manja for kite flying: मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये, म्हणून पोलिसांनी शहरात जनजागृती सुरू केली आहे. नायलॉनचा मांजा विकणाऱ्यावर आणि घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर थेट गुन्हा केला जाणार असल्याचा इशारा संभाजीनगर शहर पोलिसांनी दिला आहे. महिनाभरात छत्रपती संभाजीनगर शहरात २५ जणांना दुखापती झाल्या आहेत. कोणाचा गळा, कोणाचा हात कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये, म्हणून पोलिसांनी शहरात जनजागृती सुरू केली आहे. त्याचबरोबर नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगणारे बॅनरही लावण्यात आले आहेत.

नायलॉन मांजामुळे सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस नायलॉन मांजाविरोधात जनजागृती मोहीम राबवत आहेत. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. आतापर्यंत ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ६ जणांवर कलम ११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. नायलॉन मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी दिला होता. आता पोलिसांनी जनजागृती सुरुवात केली आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. मात्र यात जो नायलॉन मांजा वापरण्यात येतो यामुळे अनेक घटना घडून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घातली असताना देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलिसांनी अवैधरित्या मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून ९३ हजार ६०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत वैजापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज संदीप सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने मांजा कुठून घेतला याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT