अक्षय गवळी
अकोला : नायलॉन व चायनीज मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी मांजाची विक्री व वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोल्यात चायना मांज्याने ऐका महिलेचा पाय तर जिल्ह्यातील वडगाव रोठे येथील एका तरुणाचा गळा कापला गेल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये महिला व तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मकरसंक्रांतीचा सण एक दिवसावर आला आहे. यामुळे पतंगोत्सव साजरा होत आहे. मात्र पतंगोत्सव साजरा केला जात असताना नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. या धोकेदायक ठरणाऱ्या मांजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहींना यामुळे जीव गमवावा लागला आहे. यामुळे नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी छुप्या पद्धतीने याची विक्री व वापर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अकोल्यात झालेल्या दोन घटनांमुळे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
जखमी महिलेला पडले ४५ टाके
दरम्यान अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे राहणाऱ्या कलावती मराठे नामक महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाली आहे. या महिलेचा मांज्याने इतका पाय चिरला गेला आहे की तिच्या पायाला ४५ टाके पडले आहेत. मनपा आणि पोलिस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सर्वीकडे चायना मांजा दिसून येत आहे.
दुचाकीने जाणाऱ्या तरुणाचा गळा कापला
तसेच अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात नायलॉन मांजाने तरुणाचा गळा कापल्याचा प्रकार समोर आला. वडगाव रोठे येथील विश्वजीत रोठे हा २२ वर्षीय युवक नायलॉन मांजाच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान विश्वजीत हा दुचाकीने घरी जाताना तेल्हारातील शासकीय विश्रामगृह जवळ विश्वजीत रोठे याच्या गळ्याला चायना मांजा अडकल्याने जखमी झाला. त्याला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अकोल्यात ७१ हजारांचा मांजा जप्त
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित चायना, सिंथेटिक व नायलॉन मांजामुळे नागरिकांना, लहान मुलांना तसेच पक्ष्यांना इजा होत आहे. या घातक मांजामुळे अनेकजण जखमी झाले असून, महापालिकेने चारही झोनमध्ये कारवाई करीत प्रतिबंधित मांजाची ८० रिल्स जप्त केली आहेत. ४३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस प्रतिबंधित मांजाची खरेदी व विक्री करणाऱ्यांची महापालिकेची करडी नजर असणार आहे. तर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने डाबकी रोड पोलीस स्टेशन हददीतील खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथील मोहम्मद अय्याज शेख हसन याच्या घरी चायना मांजा मिळून आला. यात एकूण ६३ बंडल मांजा जप्त करत जवळपास ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.