Chhatrapati Sambhajinagar x
महाराष्ट्र

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड खुर्द येथे एका व्यक्तीने विषारी औषध पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

Yash Shirke

  • एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड खुर्द परिसरात घडली आहे.

  • सध्या घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या पाचोड खुर्द येथे एका व्यक्तीने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत. एक व्हिडीओ तयार करुन त्यात आत्महत्येला पोलीस आणि गावातील तरुण कारणीभूत असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीची पत्नी अंघोळ करत असताना गावातील एक तरुण तिला डोकावून पाहत होता. याबाबत माहिती मिळताच या व्यक्तीने संबंधित तरुणाच्या घरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर त्यांनी थेड पाचोड पोलीस स्टेशन गाठले.

पीडित व्यक्ती आणि त्याच्या पत्नीने पोलिसांकडे छेडछाडीची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कारवाई केली नाही. आरोपीला ताब्यात घेत नसल्याने आणि पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिल्याने रागात आरोपी तरुणीने पीडित व्यक्तीला त्रास देण्यास सुरुवात केली. गुन्हा दाखल केला, त्याला चार ते पाच दिवस उलटले तरीही पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले नाही यामुळे पीडित व्यक्ती त्रासला होता.

मंगळवारी (१६ सप्टेंबर) संध्याकाळी या व्यक्तीने व्हिडीओ तयार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आरोपी तरुणाला जोपर्यंत पकडत नाही म्हणून मी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करतो असे पीडित व्यक्तीने व्हिडीओमध्ये म्हटले. विष प्राशन केल्याचे गावकऱ्यांना समजले. त्यांनी तातडीने पीडित व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT