Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये डेटिंग ॲपद्वारे तरुणांची फसवणूक केली जात होती. या तरुणांना बारमध्ये नेऊन त्यांच्याकडून हजारो ते लाखो रुपये उकळले जात होते.

Priya More
  • संभाजीनगरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक

  • डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवून बारमध्ये हजारोंची लूट

  • परराज्यातील लेडीज गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश

  • डेटिंग ॲपवरून तरुणांना बारमध्ये बोलावून करायचे ३० हजारांचे बिल

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेटिंग ॲपद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या लेडीज गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. परराज्यातील ही लेडीज गँग असल्याचे तपासातून समोर आले आहे. या डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना हेरून आलिशान बारमध्ये नेल्यानंतर हजारो रुपयांची लूट केली जात होती. हे ‘डेटिंग स्कॅम’ चर्चेत आल्यानंतर तरुणांना सावधानतेचे आवाहन केले जात आहे.

डेटिंग ॲपवर तरुणांशी गोड बोलून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर बीड बायपास, चिकलठाणा परिसरातील बारमध्ये भेटण्यासाठी बोलावले जाते. बारमध्ये गेल्यानंतर ३०० रुपयांची हलक्या दर्जाची दारू देऊन २५ ते ३० हजार रुपयांचे बिल आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल भरण्यास नकार दिल्यास गुंडांमार्फत दबाव आणून पैसे उकळले जात असल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. परराज्यातील काही तरुणींच्या माध्यमातून हा प्रकार सुरू असल्याचेही समोर आले आहे.

काही बारचालकांकडून तरुणींना बिलाच्या रकमेवर २५ ते ३० टक्के कमिशन दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. नुकत्याच एका प्रकरणात 6 मित्रांच्या ग्रुपला बारमध्ये नेऊन तब्बल एक लाख रुपयांचे बिल लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात दोन तरुणांना हजारो रुपयांचे बिल देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसऱ्या प्रकरणात एका फार्मासिस्ट तरुणाकडून तब्बल २९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. या प्रकारामुळे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना ‘मनी ट्रॅप’मध्ये अडकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

लालबाग परिसरात भक्तांना विजेचा धक्का, चिमुकलीसह महिलेचा मृत्यू, एक गंभीर

कोस्टलवर BMW कारचा भीषण अपघात, BMW फुटबॉलसारखी हवेत उडाली

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

SCROLL FOR NEXT