SUV Car Accident Chhatrapati Sambhajinagar Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : १० वर्षांनी पाळणा हालला, बारसं आटोपून येताना काळाची झडप, भीषण अपघात आई बाळासह चौघांचा मृत्यू

SUV Car Accident Chhatrapati Sambhajinagar : वाऱ्याच्या वेगाने स्कॉर्पिओ पळवली अन् चौघांचा जीव घेतला; छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Drunk And Drive Accident: छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनचा भयंकर घटना घडली असून यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. १० वर्षानंतर घरात पाळणा हालला, याच बाळाचे बारसे आटोपून परत येताना मद्यधुंद तरुणांच्या कारने जोराची धडक दिली. या धडकेत आई- बाळासह चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी, आईसह दीड महिन्याच्या चिमुकला आणि सात वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय.

छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या अहदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात घडला. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. ही धडक इतकी भयंकर होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

कारमधील अजय देसरकर हे अभियंते कुटुंब बारशाचा कार्यक्रम आटोपून पुण्याकडे परतत असताना ही दुर्घटना झाली. मृणाली अजय देसरकर ,आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर (दीड महिने) आणि दुर्गा सागर गीते 7 वर्ष अशी मृतांची नावे आहेत,तर अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवण्यास दिल्याने विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष, रा.बकवाल नगर वाळूज ता.गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) आणि कृष्णा कारभारी केरे (वय 19 वर्ष) राहणार बकवाल नगर वाळूज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT