Chhatrapati Sambhajinagar Deputy Collector Devendra Katke wife attempts to kill  Saam Tv news
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : बायकोनंच रचला उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट, महाराष्ट्र हादरवणारी घटना

Deputy Collector Devendra Katke Attempt to Kill : पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या मित्राने पिस्तूल रोखले, असा आरोप देवेंद्र कटके यांनी केला आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीने आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकारी यांचं नाव असून जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एवढेच नाहीतर, बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, पतीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद उबाळे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असून त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या मित्राने केंब्रिज चौकात पिस्तूल रोखले, असा आरोप त्यांनी केला आहे. कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्र विनोद उबाळे आणि भाऊ आतिष देशमुख यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र कटके यांनी सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसातच सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झाला. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचं वर्तन बदललं. जातिवाचक बोलून 'आडवा आलास तर उडवून टाकील,' अशी धमकी दिली होती. तसेच घरी सारिकाने जातीवाचक शिवीगाळ केली. घरातील नोकरांसमोरच, 'तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेस,' असं बोलून अपमान केला. 'काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल,' अशा धमक्या दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT