Chhatrapati Sambhajinagar Crime news Saam Tv
महाराष्ट्र

'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', बड्या नेत्याच्या २६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

Former Corpoator son ends life: माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा दिपेश तनवाणीने आत्महत्या केली. 26 वर्षीय दिपेशने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात कारण स्पष्ट नाही.

Bhagyashree Kamble

  • छत्रपती संभाजीनगरमधील माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा दिपेश तनवाणीने आत्महत्या केली.

  • 26 वर्षीय दिपेशने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात कारण स्पष्ट नाही.

  • आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. व्यावसायिक आणि माजी नगरसेवक राजू तनवाणी यांच्या मुलानं आत्महत्या केली आहे. तरूणानं फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तपासात सुसाईड नोट सापडली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दिपेश तनवाणी (वय वर्ष २६) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृत तरूण व्यावसायिक आणि माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. तनवाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी दिपेश फ्लॅटमध्ये होता. त्यानं फ्लॅटमध्येच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती.

दिपेश यानं आत्महत्या केली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी दिपेश तनवाणी याच्या खोलीची तपासणी केली. तपासात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

सुसाईड नोटमध्ये त्यानं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. दिपेशनं सुसाईड नोटमध्ये 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', असं लिहिलं आहे. दरम्यान, दिपेशनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

Prajakta Mali Cannes look: प्राजक्ता माळीची कान्समध्ये मराठमोळी एंट्री; नऊवारी साडीतील लूकची परदेशी फोटोग्राफर्सनाही पडली भुरळ

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT