Chhatrapati Sambhajinagar Crime Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: नेत्याच्या वाढदिवस बॅनरवरून वाद! २५ वर्षीय तरुणाने संपवले आयुष्य; पैठण तालुक्यात खळबळ

Paithan Crime News: याप्रकरणी 12 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 08 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, संभाजीनगर...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या ईसारवाडी येथे एका बॅनरवरुन झालेल्या वादातून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. तालुक्यातील ईसारवाडी येथे ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाच्या लावलेल्या बॅनरवरील राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता.

या बॅनरवर महेशने पाय ठेवला म्हणुन गावातील 10 ते 12 तरुणांनी महेश आणि त्यांच्या घरच्या मंडळींना देखील मारहाण केली. महेश आणि कुटुंबातील सदस्यांना माफी मागण्यास भाग पाडुन सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

बॅनरच्या वादातून आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे महेश गोरक्षनाथ बोबडे याने शेतात गळफास लावुन आत्महत्या केली. याबाबतची तक्रार औद्योगिक पोलिस ठाणे पैठण येथे गोरक्षनाथ बोबडे यांनी दिली आहे. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 08 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

SCROLL FOR NEXT