Farmer Demand Helicopter : शेतात ये - जा करण्यासाठी केली चक्क हेलिकॉप्टरची मागणी; शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिले निवेदन

शेतात ये - जा करण्यासाठी केली चक्क हेलिकॉप्टरची मागणी; शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिले निवेदन
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : शेतात जाण्या-येण्यासाठी रस्त्याबाबतचा प्रशासकीय आदेश होऊन देखील अद्याप रस्ता (Solapur) मिळालेला नाही. यामुळे बार्शीच्या येळंबमधील दोन शेतकऱ्यांनी (Farmer) बार्शी तहसील प्रशासनाकडे चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे. ज्ञानदेव काळदाते आणि शंकर काळदाते अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

Solapur News
Dhule Death News: तारेवर कपडे सुकवताना झाला घात; शॉक लागून सासू-सूनेचा मृत़्यू

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील येळंबच्या काळदाते या शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या १८३ आणि १८४ गट क्रमांकाच्या शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ता मिळावा. म्हणून सप्टेंबर २०२२ ला बार्शी तहसील कार्यालयाकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये नविन रस्ता मिळावा; यासाठी रीतसर अर्ज केला होता. यावर ऑगस्ट २०२२ मध्ये चौकशी होऊन प्रशासकीय आदेश निघाला.अर्जदार काळदाते यांना १० फूट रुंदीचा नविन बैलगाडी रस्ता मंजूर ही करण्यात आला होता. त्याचबरोबर अर्जातील वादी यांनी प्रतिवादी यांना जेवढे क्षेत्र रस्त्यात गेले आहे, तेवढे क्षेत्र द्यावे असेही म्हटले होते. 

Solapur News
Jalgaon News : पत्‍नीसोबत जेवण केल्‍यानंतर संपविले जीवन; तीनच महिन्यापुर्वी झाले होते लग्‍न

त्यानंतर संबंधित मंडलाधिकारी यांनी तहसील प्रशासनाला परत पत्रव्यवहार करत तहसील आदेशात वादी म्हणजे अर्जदार यांनी प्रतिवादीला कोणत्या बाजूचे क्षेत्र द्यायचे, असा उल्लेख नाही किंवा अधिकृत आदेश नाही. त्यामुळे रस्त्याचे कामकाज ठप्प होऊन गाडीरस्ता तयार करता आला नाही, असे म्हटले आहे. या गोंधळामुळे वाटेसाठी विलंब होत असून, जमिनीची मशागत करण्यासाठी काळदाते यांना अनेक अडचणींना सामोर जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर निराश आणि उद्विग्न झालेल्या शेतकरी काळदाते यांनी तहसील प्रशासनाकडे शेतात येण्याजाण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात यावे; अशी मागणी केली आहे. दरम्यान, बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसलेल्यांच्या तक्रारीकडे या उपहासत्मक मागणीने लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com