Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News : कामावरून काढून टाकल्याचा राग, भररस्त्यात उद्योजकाला अमानुष मारहाण; ६ जणांविरोधात गुन्हा

Chhatrapati Sambhajinagar Crime News : कामावरून काढल्यावरून एका उद्योजकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात घडली.

डॉ. माधव सावरगावे

कामावरून काढल्यावरून एका उद्योजकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाळूज MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर पवार, राहुल पवार व चार अनोळखी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. वाळूज महानगरच्या सिडको वसाहतीतील नागेश्वर रमेशराव मुळे यांची खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा लक्ष्मी मिल्क या नावाने कंपनी आहे.

या कंपनीत त्यांनी दूध विक्री व व्यवसायाच्या कामासाठी ४२ जणांना कामावर ठेवलेले आहे. महिनाभरापूर्वी नागेश्वर मुळे यांनी राहुल पवार या तरुणास मार्केटिंगच्या कामासाठी नेमले. तेव्हा मार्केटिंगचे काम करताना राहुलने व्यावसायिक मुळे यांचे जालना (Jalna News) येथील वितरक तुषार भालेराव यांना तुम्ही कंपनीचा माल खरेदी करा, त्याचे पैसे मुळे यांना देऊ नका, असे फोन करून सांगितले होते.

मात्र, वितरक भालेराव यांनी मुळे यांना राहुलसोबत झालेल्या संभाषणाची रेकार्डिंग पाठवून दिली. हा प्रकार लक्षात येताच मुळे यांनी १९ जून रोजी राहुल यास जाब विचारला. त्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकले. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुल पवारने मालक मुळे यांना धडा शिकविण्याचा बेत आखला.

घटनेच्या दिवशी रविवारी (ता.३०) दुपारी एकच्या सुमारास व्यावसायिक मुळे बजाजनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील त्यांच्या कार्यालयात कामकाजात व्यस्त होते. तेव्हा त्यांना शंकर पवार या व्यक्तीने फोन करून कार्यालयाच्या बाहेर बोलावून घेतले. मुळे कार्यालयाच्या बाहेर आले. काही वेळाने राहुल पवार हाही दुचाकीवर आपल्या चार साथीदारांसह घटनास्थळी येऊन पोचला. शंकर पवार हा मुळे यांना 'तू राहुल यास कामावरून का काढले', असा जाब विचारला.

त्यानंतर शंकर पवार, राहुल पवार व त्यांच्यासोबत असलेल्या चार अनोळखींनी मुळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मुळे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, तेव्हा त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मुळे यांची सुटका केली. या मारहाणीत मुळे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाचे हाड मोडले असून ते जखमी झाले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT