chahtrpati sambhajinagar  saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: रील्सवाल्या भाईंची पोलिसांनी मस्ती जिरवली, अख्ख्या शहरात धिंड काढली, VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : हातात शस्त्रे घेऊन व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत माजवायची असे प्रकार हे 'सोशल'भाई करत असतात. पण पोलिसांनी याच रील्सवाल्या भाईंची धिंड काढून मस्ती जिरवलीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड परिसरात इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र घेऊन रील शूट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक करून आख्या शहरात त्याची धिंड काढून समाजमाध्यमांवर भाईगिरी चे विडियो पोस्ट करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या भाईंना इशारा दिला आहे.तरुणाईमध्ये आज सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. लाईक आणि कमेंट किती आल्या त्यावरून आपण किती प्रसिद्ध आहोत हे काही तरुण साध्य करत असतात. असाच काहीसा प्रकार छ.संभाजीनगर मध्ये घडला आहे.

सोशल मीडिया गॅंगस्टर म्हणून ओळखले जाणारे या रील्स भाईंनी कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन,इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केली होती. या व्हिडिओमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती .काही वेळातच पोलिसांनी या गावगुंडांना ताब्यात घेऊन शहरात या हुल्लडबाजांची चांगलीच धिंड काढली आहे. पोलिसांनी त्वरित त्या तरुणांचा शोध घेत इंस्टाग्रामवर त्यांचे रील पाहून त्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर पोलिसांनी या तरुणांची पाचोड शहरात चौका चौकात धिंड काढली आणि सार्वजनिकपणे त्यांना पोलिस ठाण्यात नेले.

सोशल मीडियावर अशा प्रकारच्या दहशतीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना पोलिसांनी ठणकवून सांगितले आहे की, अशा हिंसक आणि वाईट प्रलंबित वर्तन हे खपवून घेतले जाणार नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पाचोड पोलिस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT