Sambhaji Nagar News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: लिफ्टमध्ये अडकल्याने श्वास गुदमरला, निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू; संभाजीनगरमध्ये खळबळ

Retired Agriculture Officer Death: छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये अडकून एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे

Ghati Hospital Sambhaji Nagar News

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) लिफ्टने एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. लिफ्ट अर्धा तास बंद पडल्याने या अधिकाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

किशोर गायकवाड, असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. किशोर गायकवाड यांच्या छातीत दुखत (Retired Agriculture Officer Death) होते. त्यामुळे ते शुक्रवारी दुपारी उपचारासाठी घाटी रुग्णालयात आले होते. रूग्णालयात जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या चढून जाण्यापेक्षा लिफ्टचा वापर केला. ते बाह्य रुग्णविभागाच्या लिफ्टमध्ये गेले. परंतु ही लिफ्ट ना दुरूस्त होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लिफ्टमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

किशोर गायकवाड बाह्य रुग्णविभागाच्या या लिफ्टमध्ये जवळपास अर्धा तास अडकले. त्यादरम्यान त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून त्यांचा लिफ्टमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली (Sambhaji Nagar News) आहे.

घाटी रुग्णालयात वारंवार लिफ्ट नादुरुस्त होत (Ghati Hospital Sambhaji Nagar) असतात. अशाच एका लिफ्टने अखेर शुक्रवारी एक बळी घेतला आहे. लिफ्टमध्ये अडकल्याने किशोर गायकवाड यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रूग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह

किशोर गायकवाड यांच्यासोबत त्यांचे दोन नातेवाईकही रूग्णालयात आले होते. मात्र, ते या घटनेत वाचले आहेत. या घटनेमुळे घाटीतील 'ना दुरुस्त लिफ्ट' चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला (Ghati Hospital Sambhaji Nagar News) आहे.

घाटीतील लिफ्ट बंद पडल्यामुळे निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रूग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये काहीसं भितीचं वातावरण आहे. रूग्णालयातच लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT