Chhatrapati Sambhaji Nagar Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : इथं फक्त कायद्याचा बालेकिल्ला; जिथं दहशत माजवली, तिथंच धिंड काढली; संभाजीनगर पोलिसांची 'दबंगगिरी'

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून धिंड काढली. मारहाण आणि तोडफोड प्रकरणात कडक कारवाई; नागरिकांमध्ये दिलासा.

Alisha Khedekar

  • संभाजीनगरमध्ये गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई

  • आरोपींना अटक करून धिंड काढली

  • मारहाण आणि तोडफोड प्रकरण

  • नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांवर विश्वास वाढला

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाणीच्या आणि गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या, तसेच काही गुंडांनी दहशत निर्माण केली. त्यामुळे काही नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत काही गुंडांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या आणि त्यांना चांगली अद्दल घडावी यासाठी त्यांची धिंड काढली.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर परिसरात गारखेडा परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी मारहाणीच्या आणि गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या विरोधात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचा राग मनात धरत दोन अट्टल गुन्हेगार हातात चाकू दाखवत इंदिरानगर भागात दहशत निर्माण करत होते. या गुंडांची आतली माहिती गुप्त हेरांनी पोलिसांना देताच, जवाहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र संधीचा फायदा घेत गुन्हेगार फरार झाले होते. जवाहर नगर पोलीस स्टेशनचे पीआय सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोरे किशोर खंडागळे मंगेश घुगे यांनी तपास सुरू केला.

मारोती गोरे यांना गुप्त हेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रेल्वे पटरी शिवाजीनगर परिसरात तडीपार गुन्हेगार असल्याचे आढळले. तात्काळ त्या ठिकाणी जवाहर नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी हजर झाले. त्यांना पाहताच शेख मझर उर्फ दुंड्या (२३ वर्षे) हा पळू लागला.

पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्यासोबतच शेख अफरोज (२४ वर्षे) हा देखील असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या देखील मुसक्या आवळल्या. शेख मझर ऊर्फ दुंड्या याच्या विरोधात पंचवीस पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आलेले होते. तसेच त्याचासोबत असलेल्या गुन्हेगार शेख अफरोज याला देखील पोलिसांनी अटक केली.आरोपींच्या अटकेनंतर जिथे त्यांनी दहशत निर्माण केली केले त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT