Chhatrapati sambhaji nagar News  Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; शहरानंतर आता जिल्ह्यांचीही नावे बदलली

Chhatrapati Sambhajinagar News: राज्य सरकारने औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचंही नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच याबाबतची घोषणा करणार आहे. विशेष बाब म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही.

त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. परंतु मात्र सरकारने राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

दरम्यान, तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी सिंचन, शेती आरोग्य, शिक्षण, दळणवळण, आणि उद्योगासाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजचे गिफ्ट मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT