Chhatrapati Sambhaji Nagar 50 years old temple priest Death due to wall falling on body harsul area  Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: हृदयद्रावक! बेलाची पाने तोडताना भिंत अंगावर पडली; पुजाऱ्याचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. पूजेसाठी बेलाचे पाने तोडताना भिंत अंगावर पडून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. पूजेसाठी बेलाचे पाने तोडताना भिंत अंगावर पडून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी (ता १८ जुलै) हर्सूल जळगाव रोडवरील गजानन महाराज मंदिरात घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बबन सदाशिव गुरव (वय ५० रा. माळीवाडा, कन्नड, तालुका कन्नड) असे मयत पुजाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबन गुरव हे हर्सूल पोलीस (Chhatrapati Sambhaji Nagar) स्टेशनच्या बाजूला असलेल्या गजानन महाराज मंदिरात पुजारी होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ते या मंदिरात निवासाला होते. मंगळवारी मंदिरातील पूजेसाठी ते बेलाचे पाने तोडण्यासाठी मंदिरासमोर भिंतीलगत असलेल्या असलेल्या बेलाच्या झाडावर चढले. त्यांचा एक पाय झाडावर तर दुसरा पाय भिंतीवर होता.

यावेळी भिंत पडत असल्याचे समजताच त्यांनी उडी मारली. दुर्दैवाने भिंत बबन यांच्या अंगावर पडली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान परिसरात आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक धावत आले.

त्यांनी तात्काळ बबन यांना शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT