Kirit Somaiya News: भाजप नेते किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेकडून तपासाला सुरूवात

Kirit Somaiya Viral Video: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Anil Parab Resort scam case News, 
Kirit Somaiya news in Marathi
Anil Parab Resort scam case News, Kirit Somaiya news in MarathiSaam Tv
Published On

Kirit Somaiya Viral Video: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कथित व्हायरल व्हिडीओचा तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखा युनिट १० चे पथक कथित व्हिडीओच्या सत्यतेची तपासणी करणार आहे.

विशेष बाब म्हणजे, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर पथकाची मदत घेणार आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला.

Anil Parab Resort scam case News, 
Kirit Somaiya news in Marathi
Shivsena 16 Mla Disqualification: १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विधानसभेत या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आता मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे राज्य महिला आयोगही किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात सक्रिय झाला आहे. महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

Anil Parab Resort scam case News, 
Kirit Somaiya news in Marathi
ATS and Pune Police Detain 2 persons : पुण्यात ATS मोठी कारवाई, देशविरोधी कृत्याच्या संशयावरून दोघे ताब्यात

दरम्यान, हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडीओची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता गुन्हे शाखेच्या तपासात काय समोर येणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com