rajan salvi 
महाराष्ट्र

त्यांचे 'ते' वक्तव्य चिथावणीखोर; गुन्हा दाखल करा, सेना सरसावली

अमोल कलये, अनंत पाताडे

रत्नागिरी- सिंधूदुर्ग : छत्रपती संभाजी महाराज Chhatrapati Sambhaji Maharaj यांना संगमेश्वरात अटक झाली हाेती आणि आैरंगजेबचे Aurngazeb राज्य संपले हाेते असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमाेद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना संगमेश्वरात अटक झाल्यानंतर केले हाेते. हे वक्तव्य चिथावणीखाेर असून जठार यांच्यावर १५३ ब, १५३ (१), ५०५ (२), ५०० कलमानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी rajan salvi यांनी कणकवली येथे तसेच आमदार वैभव नाईक vaibhav naik यांनी रत्नागिरी आणि संगमेश्वर पाेलिस ठाण्यात याबाबतचा तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जात नारायण राणे हे बहुतांश फौजदारी गुह्यांत संशयित आरोपी असताना त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी करणे हे याेग्य नाही. खरं तर हे निंदनीय कृत्य आहे. प्रमाेद जठार यांनी जाणीवपूर्वक असे करून छत्रपती संभाजी महाराज यांचे शिष्य व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

या चिथावणीखाेर वक्तव्यामुळे तक्रारदार व त्यांचे अनुयायी आणि नारायण राणे व जठार समर्थकांमध्ये द्वेश, शत्रुत्व भावना पसरली आहे. परस्पर गटांमध्ये वाईट भावनांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे कायदा व सुववस्था धाेक्यात आली आहे. जठार यांच्या वक्तव्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात वाईट परिणाम व पडसाद उमटले आहेत. दाेन गटांत अत्यंत शत्रुत्व निर्माण हाेऊन त्याला हिंसक वळण लागणारे आहे असे तक्रारीत म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT