Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: याद राख, माझ्या शेपटीवर पाय ठेऊ नको; अंबडच्या सभेतून भुजबळांचा जरांगेंना इशारा

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय.

Bharat Jadhav

Chhagan Bhujbal warn To Jarange Patil:

याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस, असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना दिला. आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ओबीसी समाजाची एल्गार सभा झाली. या सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवला. (Latest News)

मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय. दोन्ही नेत्यांनी एकमेंकावर टीकेची झोड उठवलीय. आज जालन्यातील अंबडमध्ये मराठा समाजाला सरकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. जरांगे पाटलांच्या या मागणीवर ओबीसी समाजाकडून विरोध केला जातोय. ओबीसी नेते आणि राज्यात मंत्री पदावर असलेले छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत जरांगेच्या मागणीला विरोध केलाय. तर काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनीही ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज अंबडमध्ये झालेल्या ओबीसी सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. जरांगेच्या मागणीवर टीका करताना भुजबळ म्हणाले की, न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस, असा इशारा भुजबळांनी दिलाय.

ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती, त्यावेळी भुजबळ यांनी त्या मागणीला विरोध केला होता. त्यावरून टीका करताना जरांगे-पाटील यांनी भुजबळांच्या तुरुंगवारीवर विधान केलं होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगन भुजबळांना तुरुंगात जावे लागलं होतं. एका सभेत बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला भुजबळांनी आज उत्तर दिलं.

जरांगेंनी काय केली होती टीका

जरांगेच्या सभेच्या खर्चावरून भुजबळांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना जरांगेंनी टीका केली होती. ज्या गोरगरिब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं त्यांचेच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला. याचमुळे तुमच्यावर धाड पडली आणि तुम्ही जेलमध्ये गेलात. दोन वर्ष जेलमधून बेसन खाऊन आलात आणि आम्हाला शिकवता- पैसे कुठून आले? अशी टीका जरांगेंनी केली होती.

एकमेकांचं काढलं होतं खाणं

भुजबळांनी गोरगरिब लोकांचं खाल्लं म्हणून त्यांना जेलवारी करावी लागल्याची टीका जरांगे पाटील यांनी केली होती. त्याला भुजबळांनी आज उत्तर दिलं. आधीही भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र सोडलं होतं. मी जरांगे पाटलांचं काय खाल्लं हे त्यांनी सांगावं. तर ते कोणाचं खातं आहेत हेही त्यांनी सांगावं अशा शब्दात भुजबळांनी हल्लाबोल केला होता.

जरांगेची आधीची परिस्थिती काय होती, आता कशी आहे. जरांगे ते त्यांच्या संस्कृतीने बोलतात, त्यांच्या संस्कृतीत कोणाचं खाणं काढलं जातं. ही त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे. आरक्षणाविषयी त्यांचा अभ्यास कमी आहे. परंतु त्यांचे म्हणजे जरांगे पाटील यांचे शिक्षण कमी असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या संस्कृतीवर होत असल्याची टीका भुजबळांनी केली होती. आजच्या सभेतही भुजबळांनी जरांगेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं. मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का? भुजबळ २ वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व: कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”,असा घणाघात भुजबळांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT