Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार, 'या' खात्याचा पदभार स्वीकारणार

Chhagan Bhujbal Sworn In as Minister: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी १० वाजता राजभवन येथे त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.

Priya More

राज्याच्या राजकारणामधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आमदार धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे. आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवनात त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी होती. आता हे खातं छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. पण आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

छगन भुजबळ यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज सकाळी १० वाजता राजभवनामध्ये पार पडणार आहे. ५० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजभवनामध्ये काल रात्रीच तयारी करण्यात आली. सर्वांना सकाळी ९ वाजेपर्यंत राजभवनात येण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ मंत्री होणार असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते मंत्री होणार असल्याचे वृत्त कळाताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे अडचणीत आले. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खातं हे कुणाकडे जाणार याबाबत चर्चा होती. अखेर हे खातं अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT